होऊन गेलेल्या गोष्टी व त्याचे आजच्या जगण्यावर झालले परिणाम कधी बदलू शकत नाहीत. अनेकदा वाटते जे होऊन गेले ते तसे व्हायला नको होते पण आपण कधीही काहीही करताना आस विचार करीत नाही की जे करतो आहे ते चांगले झाले तर ठीकच पण जर ते बिघडले तर पुढे जाऊन त्याबद्दल आपणास काय भोगावे लागेल. खरे तर असा विचार करीत बसलो तर आपल्या हातून काही घडणारच नाही मग ते चांगले आसो व वाईट. माझ्या मतानुसार जे मागे होऊन गेले आणी बिघडले ते दुर्लक्षित करायचे कारण ते विसरणे शक्य होईलच असे नाही. आणी सोबतच पडताळणी देखील करून पहायचे की त्यामध्ये नेमके काय चुकीचे होते आणी जमलेच तर आशी चूक पुन्हा घडून दायची नाही. असेही आसू शकते कि चूक तुमची नसेलच दुसऱ्याच्या कर्माचे खापर देखील आपल्या माथी येऊ शकते आणी त्या वेळी मात्र नक्की सुधारायचे कोणाला हा प्रश्न पडतो. . . . . कदाचित या वेळीदेखील चूक आणी चुक करणारा याच्याकडेही दुर्लक्ष करणे हाच मार्ग असावा.