अबोल भाषा

ढग बरसतात, धरती भिजते
ते ओसरतात आणी ती सजते.
त्या बरसन्यात त्या भिजन्यात,
त्या ओसरन्यात आणी सजन्यात
रुजली प्रीती ची अबोल भाषा
भाषेतले त्या प्रेमगीत गाऊ ,
प्रितीच्या ओल्या रंगात न्हावू .
जाऊ त्या कुरणात हिरव्या ,
एकमेकांत हरवून जाऊ .