मैत्री म्हणजे अनेक गोष्टी साध्य करण्यासाठी केलेली सोय असते

अनेकदा मैत्री म्हणजे अनेक गोष्टी साध्य करण्यासाठी केलेली सोय असते. मित्र म्हणजे एक दुभत जनावर जे निमुटपणे दुध देत जाते पण त्याला माहीतच नसते की ज्या दिवशी दुध बंद होईल तेव्हा त्याची किंमत शुन्य असणार आहे. आणी मग त्याच्याकडे होऊन गेलेल्या सर्व गोष्टींवर पश्चाताप करण्यापुढे काहीच उरत नाही. 
समाजात दोन प्रकारचे मित्र असतात त्यातला एक असतो तो मैत्रीकडे खूप आदराने पाहतो, मैत्रीत सगळ काही देऊ करतो तर दुसरा असतो तो फक्त आणि फक्त फायदा काढून घेण्यात मग्न असतो, त्याला भावनांची कदर असेलच आसे नाही. जेव्हा या नात्यात दुरावा निर्माण होत जातो तेव्हा एक मित्र आगदी शांत होऊन आपल्या वाटेने निघून जातो एकही प्रश्न न विचारता आणी दुसरा मात्र त्याला मागून पुन्हा पुन्हा प्रश्न विचारात आसतो की तू का जातो आहेस? का जातो आहेस? पण त्याने जर तोच प्रश्न एकदा स्वःताला विचारला तर उत्तर नक्कीच मिळेल की जाणारा नक्की का जातोय?

नाते जोडताना स्वार्थ बाजूला ठेवावा, असे प्रेत्येकालाच वाटते.
नाते अतूट असावे कधीच न तुटावे, असे प्रेत्येकालाच वाटते,
पण. . असे वाटणाऱ्या अनेकांना, फक्त असे वाटतच राहते.

शब्दांच वादळ

शब्दांच वादळ उठलं आहे शिरात.
लेखणीला भय वाटू लागले आहे.

निर्जीव जगण्याला मी जगणे मनातच नाही

जेव्हा अस्वस्थ वाटायला लागते, तेव्हा जिवंत असल्याची जाणीव होते. 
निर्जीव जगण्याला मी जगणे मनातच नाही.

दुर्लक्ष करणे हाच मार्ग असावा

होऊन गेलेल्या गोष्टी व त्याचे आजच्या जगण्यावर झालले परिणाम कधी बदलू शकत नाहीत. अनेकदा वाटते जे होऊन गेले ते तसे व्हायला नको होते पण आपण कधीही काहीही करताना आस विचार करीत नाही की जे करतो आहे ते चांगले झाले तर ठीकच पण जर ते बिघडले तर पुढे जाऊन त्याबद्दल आपणास काय भोगावे लागेल. खरे तर असा विचार करीत बसलो तर आपल्या हातून काही घडणारच नाही मग ते चांगले आसो व वाईट. माझ्या मतानुसार जे मागे होऊन गेले आणी बिघडले ते दुर्लक्षित करायचे कारण ते विसरणे शक्य होईलच असे नाही. आणी सोबतच पडताळणी देखील करून पहायचे की त्यामध्ये नेमके काय चुकीचे होते आणी जमलेच तर आशी चूक पुन्हा घडून दायची नाही. असेही आसू शकते कि चूक तुमची नसेलच दुसऱ्याच्या कर्माचे खापर देखील आपल्या माथी येऊ शकते आणी त्या वेळी मात्र नक्की सुधारायचे कोणाला हा प्रश्न पडतो. . . . . कदाचित या वेळीदेखील चूक आणी चुक करणारा याच्याकडेही दुर्लक्ष करणे हाच मार्ग असावा.

व्यक्त व्हायचं राहिलंय

तुझ्या प्रेमात आजवर,
मी सार काही वाहिलंय. 
तरी असेच का वाटते मला, 
प्रेम व्यक्त व्हायचं राहिलंय.

थोडासा हताश आहे

थोडासा हताश आहे, नक्की कारण माहित नाही पण शोध घेणे चालू आहे. असे वाटू लागले आहे की ज्या गाडी मध्ये बसून प्रवास करतो आहे ती गाडी पुन्हा पुन्हा फिरून एकाच ठिकाणी येत आहे खिडकी बाहेरील चित्रे तीच ती येत आहेत. आता हि ही गाडी नक्की पुढच्या गावाला जाणार की या गाडीला राम राम ठोकावा काळात नाही. पण असे हि वाटते आहे की हि गाडी सोडली तर दुसरी गाडी मिळेल का? की उगीचच पायपिट करावी लागणार किंवा त्याच वीट आलेल्या गावात मुक्काम पडणार? प्रश्न तसा विचित्र आहे पण असेच काहीतरी विचित्र अनुभवतो आहे.

नवं जळणं

आठवणीच्या सरणावर,
एक प्रेत एकटच जळत आहे
मरणं जरी रोजच असलं,
जळणं मात्र नवं आहे.
- विक्रम ढेंबरे
ओठांच्या कळ्यांत, 
हसणे उमलते. 
गालावरच्या खळीची, 
साथ त्यास मिळते. 
पापणीच्या शिंपल्यात, 
मोती नजरेचा चमके. 
केसांची ही रेशीमरेष, 
वाऱ्यावर लहरे. 
तुझ्या रुपात थिजले, 
माझे कटाक्ष चोरटे. 

-विक्रम ढेंबरे