भातुकलीचा डाव

कधी भातुकलीचा डाव . . . कधी विस्कटलेल गाव
माझ्याच मना उमगेना, माझ्याच मनाचा ठाव...

मन ओथंबून जाते, कधी होते खालीवरती
कधी धडपडते, अवघडते, तुझ्याच वाटेवरती
क्षणभरात उडते, घेते, ते तुझ्या घराशी धाव...
कधी भातुकलीचा डाव... कधी विस्कटलेला गाव...


कधी हासुन जाते कोणी, अन फुलते अंगण माझे
कधी गंधावर वा-याच्या, झुलते कुंपण माझे
कधी उदासवाणा असतो, या चेह-यावरती भाव...
कधी भातुकलीचा डाव... कधी विस्कटलेला गाव...


बहरते शहारे कोणी, कधी विसरे हा किनारा
हर क्षणात शोधत जाई, सखये तुझा सहारा
जान मनीची तन्मयता, घे भावनांचा ठाव
कधी भातुकलीचा डाव... कधी विस्कटलेला गाव...

- विक्रम