स्वप्नांची एक वेल

स्वप्नांची एक वेल होती हळूवार चढनारी.
वरयाची एक झूळुक आली खाली तिला पाडनारी .

झूळुक आली, वादळ होउन गेली,
वेलीवरची स्वप्ने तीने फरफटत नेली

- विक्रम

ठेच आणी अनुभव

लागलेल्या प्रत्येक ठेचेबरोबर ऊठायचे ते अनुभव घेउनच,
पुन्हा नवीन ठेच लागून पडन्यासाठी...

ठेच लागली त्यात त्या दगडाचा काय दोष ?
त्याची जागा चुकत नहीं चुकतात ती आपली पावले.
(क्रमशः . . . . )


- विक्रम

मागेच पाहून.

यापुढे लिहायचे नहीं असे लिहुनाच ठेवणार आहे
विसरु नये म्हणून.

मागे गेलेल्या क्षनांना पुन्हा जगायचे नहीं,
हे ठरवतोय पुन्हा मागेच पाहून.

- विक्रम

स्वप्नांची कोडी

स्वप्नांची कोडी सहज सूटली असती तर,
पापण्यांची गरजच भासलीच नसती.

- विक्रम

(मी लिहिलेल्या 'स्वप्न साठलेले' या कवितेवर पुन्हा सुचलेले शब्द)

आठवण

लाटेसारखी आज पुन्हा तुझी आठवण उसळून येणार,
किनर्‍याच्या रेतीच्या काणांची जगा मग बदलणार,

त्या प्रत्येक लाटेला कवेत घेण्यासाठी मन हे वेडे धावणार,
त्या आवखळ लटांना सवरण्याचा अट्टाहास ते धरणार,

का तो अट्टहास, का ते वेडे होणे,
लाटना सावरताना स्वता पण भिजून जाणे ?

आलेली लाट विरून तर जातेच पुन्हा त्याच सागरात
किनार्यावर उरतात तेच कण भिजलेले, विस्कटलेले,
पुन्हा येनारया लाटेच्या प्रतिक्षेत नव्याने नटलेले

येणारी हर एक लाट अशी

तू नसताना . . . . ..

तू नसताना . . . . . . . . . . .
तू नसताना तुज्यासोबत बोलने,
कल्पनेच्या आरश्यात तुलाच बघणे,
आठवांच्या झूल्यात झुलने ,
कधी शब्दाविन बोलने आता झालाय .
तू नसताना . . .

-विक्रम

गुलाम शब्द

कितीही सजवा वाक्यात दिसतील फ़क्त वेगळे
विचार हर एक तुज़ाच गुलाम.
तुज्याच भोवती फिरती शब्द माजे सगळे

- विक्रम

भातुकलीचा डाव

कधी भातुकलीचा डाव . . . कधी विस्कटलेल गाव
माझ्याच मना उमगेना, माझ्याच मनाचा ठाव...

मन ओथंबून जाते, कधी होते खालीवरती
कधी धडपडते, अवघडते, तुझ्याच वाटेवरती
क्षणभरात उडते, घेते, ते तुझ्या घराशी धाव...
कधी भातुकलीचा डाव... कधी विस्कटलेला गाव...


कधी हासुन जाते कोणी, अन फुलते अंगण माझे
कधी गंधावर वा-याच्या, झुलते कुंपण माझे
कधी उदासवाणा असतो, या चेह-यावरती भाव...
कधी भातुकलीचा डाव... कधी विस्कटलेला गाव...


बहरते शहारे कोणी, कधी विसरे हा किनारा
हर क्षणात शोधत जाई, सखये तुझा सहारा
जान मनीची तन्मयता, घे भावनांचा ठाव
कधी भातुकलीचा डाव... कधी विस्कटलेला गाव...

- विक्रम

आस भेटीची

आस मनी भेटीची
कधी होणार ही पूरी ?
रोजचा परततो
एकच आस घेउन मनी.

स्वप्न साठलेले.

पापण्यांच्या पडद्यामागे एक स्वप्न साठलेले
उघड्या डोळ्यात मात्र आसवांचे गाव दाटलेले
सत्याला चाहुल लागलीये उगवत्या स्वप्नांची
सत्य नी स्वप्नात आता अंतरे फ़क्त पापण्यांची

स्वप्नांच्या कुशीत एक बीज खोल रुजलेले
प्रेमाच्या सावली साठी वेडे ते आसुसलेले
ओल्या नभात भिजन्याचे स्वप्न
एक साठलेले
उघड्या डोळ्यात मात्र आसवांचे गाव दाटलेले


भेट कही क्षणांची, बंध जणू जन्मान्तरिचे
नजर मृदु लाजरी , पंख जणू पखाराचे
त्या कोमल पंखावरती जग मी नवे थाटलेले
उघड्या डोळ्यात मात्र आसवांचे गाव दाटलेले...

- विक्रम