थोडासा हताश आहे, नक्की कारण माहित नाही पण शोध घेणे चालू आहे. असे वाटू लागले आहे की ज्या गाडी मध्ये बसून प्रवास करतो आहे ती गाडी पुन्हा पुन्हा फिरून एकाच ठिकाणी येत आहे खिडकी बाहेरील चित्रे तीच ती येत आहेत. आता हि ही गाडी नक्की पुढच्या गावाला जाणार की या गाडीला राम राम ठोकावा काळात नाही. पण असे हि वाटते आहे की हि गाडी सोडली तर दुसरी गाडी मिळेल का? की उगीचच पायपिट करावी लागणार किंवा त्याच वीट आलेल्या गावात मुक्काम पडणार? प्रश्न तसा विचित्र आहे पण असेच काहीतरी विचित्र अनुभवतो आहे.
आठवणीच्या सरणावर,
एक प्रेत एकटच जळत आहे
मरणं जरी रोजच असलं,
जळणं मात्र नवं आहे.
- विक्रम ढेंबरे
ओठांच्या कळ्यांत, हसणे उमलते. गालावरच्या खळीची, साथ त्यास मिळते. पापणीच्या शिंपल्यात, मोती नजरेचा चमके. केसांची ही रेशीमरेष, वाऱ्यावर लहरे. तुझ्या रुपात थिजले, माझे कटाक्ष चोरटे.
-विक्रम ढेंबरे
त्या आठवणी
धुक्याच्या पडदयामागे उमटतात,
धुसर पुसटश्या जुन्या त्या आठवणी. . .
पुन्हा पहाव्या पुन्हा जगाव्या, पुन्हा हव्याश्या वाटतात त्या आठवणी.
पानावर दवापरी उतरतात, क्षणिक ओलावा देऊन ओझरतात त्या आठवणी
- विक्रम ढेंबरे
कित्येकदा मांडलेले, कित्येकदा विस्कटते. नवे डाव मांडता मांडता, हातून बरेच कही निसटते,
जे मिळवले ते आपले, हरवले ते नियतीचे. उरले सुरले घेउन तारे, आकाश आपले सजवायचे
कधी न थकता, न थांबता पुढे पुढेच चालत रहायचे. . . .
पावसाला माझे सांगणे आहे, तू आता बरसणेच सोडून दे. नाहीतर असे कर ना. . . तुझा तू बरसातच रहा, माझी काही हरकत नाही, फ़क्त तुज सोबत जडलेल्या आठवणी तेवढया खोडून जा.