उन्हाळा लागला की आठवणींचा मळा फुलायला लागतो. सुट्टी लागली की आपल्या घरी
नसल्या तरी दुसऱ्याच्या शेळ्या राखायला जायचे. अचानक एवढया सगळ्यांचे attention मिळाल्याने शेळ्यांना पण कदाचित heroin झाल्यासारखे वाटत असेल.
शेळ्यांच्या निम्मित्ताने बराच काही साधून जायच. सकाळ पासून संध्याकाळ
पर्यंत अगदी राना वनात बोंबलत फिरायची अधिकृत परवानगी मिळायाची. कोणाच्या
आंब्याला पाड लागला हे पहाण्यासाठी पाखरांनी काढलेली टोकर शोधायची. कुठे
कोणाच्या बोरीला जाऊन काट्यात हाथ घालून तर कधी दगड मारून बोरं गोळा करायची.
वरच्या मळ्यातल्या विहिरीत पाणी आगदी तळाला असायचे किंवा नसायचेच म्हणून खालच्या मळ्यात अगदी वडयाजवळच्या विहिरीत परूसभर पाण्यात का होईना पण पोहायचे. तलावाच्या पट्टीच्या खाली चिंचेवर हमखास एखादे म्हव सापडायच मग धाडस करून ते उठवायचे मिळेल तेवढा मध चाखायचा. दुपारी आंब्याच्याखाली भाकरी, मिरचा, चटणी, कांदा . . . लिहिताना तोंडाला पाणी सुटल. झोपाळे, सूर पारंब्या चे डाव IPL पेक्षा जोरात चालायचे. सारं अनुभव आठवून AC मधल्या उन्हाळ्याचे चटके लागायला लागलेना राव.