त्या आठवणी

धुक्याच्या पडदयामागे उमटतात, 
धुसर पुसटश्या जुन्या त्या आठवणी. . .  

पुन्हा पहाव्या पुन्हा जगाव्या,
पुन्हा हव्याश्या वाटतात त्या आठवणी. 

पानावर दवापरी उतरतात,
क्षणिक ओलावा देऊन ओझरतात
त्या आठवणी


- विक्रम ढेंबरे