कित्येकदा मांडलेले,
कित्येकदा विस्कटते.
नवे डाव मांडता मांडता,
हातून बरेच कही निसटते,

जे मिळवले ते आपले,
हरवले ते नियतीचे.
उरले सुरले घेउन तारे,
आकाश आपले सजवायचे

कधी न थकता, न थांबता
पुढे पुढेच चालत रहायचे. . . .