पाऊस येणार
पाऊस येणार, पाऊस येणार, हिरवे होऊन शिवार सजणार.
मोती बरसणार, झरे वाहणार, इंद्रधनुचे रंग उमटनार.
ती आणी तो, तो आणी ती, एकाच छत्रीत मानसोक्त भिजणार.
- विक्रम ढेंबरे
दुष्काळ
नाही बरसले ढगही पुन्हा,
धरणीचे आंगण सजवाया.
पिकही ना तरले उभ्या रानात,
पोटांची या खळगी भराया.
धरणीची हो माया आटली,
इथ ना कोणी तहान भागवाया.
आपुलकीची नाळ तुटली,
कुंपणच उठले शेत खाया.
दुष्काळाच्या या चित्ते वरती,
सारे काही भाजत आहे.
राणा शिवारात आमच्या,
सुतक शांतता भासत आहे.
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Comments (Atom)